Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रकीबुलची चौकशी करणार 'एनआयए'चे पथक!

रकीबुलची चौकशी करणार 'एनआयए'चे पथक!
रांची , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (14:26 IST)
उत्तर प्रदेशातील रंजीत कोहली उर्फ रकीबुल हसन आणि खेळाडू तारा शाहदेव प्रकरणाची केंद्राने गांर्भीर्याने दखल घेतली आहे. गृह मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सोमवारी 'एनआयए'कडे सोपवली. यामुळे आता या प्रकरणाची चौकशी एनआयएचे पथक करणार आहे. 
 
गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांचे एक पथकही रांचीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. रकीबुल याचे संबंध परदेशापर्यंत असल्याचा संशय आल्यानंतर एनआयएच्या पथकाला अलर्ट करण्यात आले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी रकीबुल दिल्लीला गेला होता, असाही संशय व्यक्त केला जात आहे.  रकीबुलचे लखनौशी कनेक्शन आहे. लखनौमधील आयडी मित्रा नावाच्या व्यक्तीबरोबर तो चर्चा करायचा. या कनेक्शनची चौकशी दिल्ली पोलिस करणार आहेत.
 
रांची पोलिस सोमवारी रकीबुलला कोर्टात हजर करणार आहेत. रकीबुलच्या कोठडीत वाढ करून घेण्यासाठी कोर्टाकडे मागणी केली जाणार चौकशीचा वेग वाढावा म्हणून कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जाणार असल्याचे एसएसपी प्रभात कुमार यांनी सांगितले आहे. 
 
दरम्यान, पोलिसांनी रविवारी रकीबुल हसन याच्या घरी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. त्यात पिवळा अंबर दिव्यासह 15 मोबाइल आणि 36 सिमकार्डचा समावेश आहे.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi