Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामदेवबाबा टीम अण्णासोबत

रामदेवबाबा टीम अण्णासोबत

वेबदुनिया

लोकपाल विधेयकासाठी लढत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु रामदेव बाबा पुन्हा एकत्र आले आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये ते आता एकत्रिपणे प्रचार करणार आहेत.

स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन टीम अण्णाच्या वतीने करण्यात येणार आहे. कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात ते प्रचार करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांनी मुंबईत उपोषण केले होते. त्यावेळेस त्यांनी रामदेव बाबांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर टीम अण्णाचे सदस्य मनीष सिसोदिया यांनी रामदेव बाबांना पाच राज्यांतील प्रचार मोहिमेत सहभाग घेण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. तो त्यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु रामदेव बाबा टीम अण्णासोबत कधी आणि कुठे प्रचार करणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi