Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील कार दरीत कोसळली

राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील कार दरीत कोसळली
दार्जिलिंग , शुक्रवार, 15 जुलै 2016 (14:24 IST)
दार्जिलिंगपासून १६ किमी अंतरावर सोनाडाजवळ दरीत राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील कार कोसळली. प्रणव मुखर्जी यांच्या गाडीच्या मागे असलेले तिसरे वाहन दरीत कोसळले. या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले आहेत.

राष्ट्रपती बागडोगरा येथून ते दिल्लीला परतणार होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्यामागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाहन ताफा होता.  पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ममता बॅनर्जी गाडीतून उतरल्या आणि बचाव कार्यात गुंतल्या. जखमींना दार्जिलिंग येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थवर गुन्हा