Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेखाऐवजी राखी सावंतला खासदार बनवा : आठवले

रेखाऐवजी राखी सावंतला खासदार बनवा : आठवले
नवी दिल्ली , बुधवार, 13 ऑगस्ट 2014 (13:01 IST)
अभिनेत्री राखी सावंत आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत धम्माल उडवून दिली. राखीने रामदास आठवले मंत्री तसेच पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली तर आठवले यांनीही रेखाऐवजी राखीला खासदार बनवा, तिला रोज घेऊन येण्याची जबाबदारी माझी, असे विधान करत सार्‍यांनाच अवाक् करून टाकले.
 
आरपीआयची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राजधानी दिल्लीत होत आहे. पण त्याआधीच राखी आणि आठवले यांच्या जंगी पत्रकार परिषदेने सर्वाचे लक्ष वेधले आहे. दिल्लीत सध्या राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या गैरहजेरीचा वाद रंगला आहे.
 
अनेक खासदारांनी या दोघांच्या सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या वादात उडी घेत राङ्कदास आठवले यांनीही आपल्या खास शैलीत त्यावर तोंडसुख घेतले आहे.
 
राखीसाठी मोदींना साकडे!
 
‘रेखा जर राज्यसभेत हजेरी लावत नसेल तर तिची खासदारकी राखी सावंतला द्या’, अशी मागणी आठवले यांनी केली. ‘रेखा ही मोठी अभिनेत्री आहे. तिला खासदार केल्याचा आम्हाला आनंदच झाला होता. मात्र ती संसदेत हजेरी लावत नसेल तर ते काही योग्य नाही. जया बच्चन या जर संसदेत नियमीत हजेरी लावतात तर मग रेखा का येऊ शकत नाही?’, असे अजब तर्कटही आठवले यांनी मांडले. राखीचे वडील कोकणातले आहेत, तर आई गुजरातची आहे. त्यामुळेच मी मोदींकडे राखीच्या नावाची शिफारस करणार आहे, असेही आठवले पुढे म्हणाले.
 
आठवलेसाहेब पंतप्रधान व्हावेत!
 
रामदास आठवले यांनी दलित जनतेसाठी मोठा त्याग, संघर्ष केला आहे. त्यामुळे ते मंत्री व्हावेत आणि भविष्यात त्यांना देशाचे पंतप्रधानपद मिळावे, अशी आमची इच्छा असल्याचे यावेळी राखी सावंत हिने सांगितले.
 
आठवले यांच्यावर एक मराठी चित्रपट बनवणार असल्याचेही यावेळी राखीने सांगून टाकले. तेव्हा या चित्रपटात मला काम मिळणार का?, असा सवाल आठवले यांनी केला आणि पत्रकार परिषदेत एकच खसखस पिकली.  

Share this Story:

Follow Webdunia marathi