Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे दुर्घटना टळली

रेल्वे दुर्घटना टळली
मुंबई , शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2016 (14:21 IST)
डहाणू-बोरिवली लोकल पालघर स्टेशनवरील सायडिंगच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असताना लाल सिग्नल असतानाही पुढे सरकली. मात्र गार्डला चूक जाणवल्यानंतर त्याने इमर्जन्सी ब्रेक्स दाबून गाडी मेन लाईनपासून काही मीटर अंतरावर थांबवली. पुढच्याच क्षणाला अमृतसर-मुंबई सेंट्रल सुवर्णमंदिर एक्स्प्रेस शेजारच्या ट्रॅकवरुन निघून गेली. पश्चिम रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना टळली. डहाणू-बोरिवली ही 12 डब्यांची लोकल बुधवारी सकाळी 6.35 मिनिटांनी पालघर स्टेशनवर लाल सिग्नल तोडून पुढे सरकली. मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर मोटरमनने  ब्रेक लावला आणि पुढच्या क्षणात वेगाने आलेली गोल्डन टेम्पल मेल अगदी जवळून निघून गेली.

Share this Story:

Follow Webdunia marathi