Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहितचा मित्र विद्यापीठातून बेपत्ता झाल्याने खळबळ

रोहितचा मित्र विद्यापीठातून बेपत्ता झाल्याने खळबळ
हैदराबाद- हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच रोहितसोबत शिकणारा त्याचा आणखी एक मित्र शनिवारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. दित्ती सुरेश असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो पीएच.डी.च्या तिसर्‍या वर्षाचा विद्यार्थी आहे.
 
दित्ती सुरेश हा डॉ. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा सदस्य आहे. विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये 25 नंबरच्या रूममध्ये तो राहत होता. विद्यापीठाच्या हेल्थ 
 
सेंटरमधून शनिवारी तो अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. सुरेश हा डिप्रेशनमध्ये होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi