Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नात आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

लग्नात आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न
गोंदिया , सोमवार, 21 एप्रिल 2014 (17:27 IST)
मावस बहिणीच्या लग्नाला आलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्‍याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेच्या मेहूण्यानेच हा प्रकार केला असल्याचे समजते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील भडगाव येथील 32 वर्षीय महिला तिच्या मावस बहिणीच्या लग्नासाठी पळसगाव येथे आली होती. तेथून तिला तिच्या मेहूण्याने उचलून गावाशेजारी असलेल्या जंगलात नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधाराचा फायदा घेत तिने नराधमांच्या तावडीतून स्वत:ची सूटका करून घेतली.
 
पीडितेने सांगितले की, शनिवारी रात्री लग्न समारंभ सुरु असताना तिचा मेहूणा आणि आरोपी राकेश नेताम याने आपल्या चार सहकार्‍यासह तिला लग्नमंडपातून उचलून नेले. गावानजीक असलेल्या जंगलात तिला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्‍याचा प्रयत्न केल्याचे चिंचगड पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोप राकेश नेतामसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले असल्याचे उपपोलिस निरीक्षक संदीप म्हस्के यांनी सां‍गितले आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi