Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नास नकार दिल्याने मुलीवर गोळीबार

लग्नास नकार दिल्याने मुलीवर गोळीबार
बेंगलोर , बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:51 IST)
एकतर्फी प्रेमातून  शिपायाकडून मुलीचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील प्रगती रेसिडेन्शियल स्कूल हॉस्टेलबाहेर ही घटना घडली.
 
पी.यू.कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करणार्‍या महेश याने हे कृत्य केले असून मृत मुलीची मैत्रीणही गंभीर जखमी झाली आहे.  हॉस्टेल बाहेर चालेल्या सबंधित मुलीला महेशने लग्नाची मागणी घातली मात्र, तिने स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याने गोळीबार केला व तो पळून गेला. नागरिकांनी मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला तर तिच्या मैत्रिणीची स्थिती गंभीर आहे. पोलिस महेशचा शोध घेत आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi