Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लैंगिक छळाचा आरोप ; पचौरींचा राजीनामा

लैंगिक छळाचा आरोप ; पचौरींचा राजीनामा
दिल्ली , बुधवार, 25 फेब्रुवारी 2015 (11:27 IST)
आयपीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र के. पचौरी यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. लैंगिक छळाचा आरोप झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.
 
पचौरी प्रमुख असलेल्या ‘टेरी’तील कर्मचारी महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावरून दिल्ली पोलिसांनी पचौरींविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
दरम्यान, पचौरी यांनी राजीनामा दिल्यानंतर आयपीसीसीने नियमानुसार उपाध्यक्ष इल गिझोउली यांच्याकडे आयपीसीसीच्या प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi