Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वढेरांविरुद्ध तक्रार दाखल करून दाखवाच- दिग्विजय

वढेरांविरुद्ध तक्रार दाखल करून दाखवाच- दिग्विजय
नवी दिल्ली , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (12:25 IST)
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून दाखवाच, असे थेट आव्हान कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी दिले आहे. 'सत्तेत आल्यावर वढेरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून त्यांना तुरुंगात टाकू', असे भाजप नेते अरुण जेटली यांनी वक्तव्य केले होते. यावर दिग्विजयसिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'अरुण जेटली हे एक वकील आहेत. जर रॉबर्ट वढेरा यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर भाजपने आतापर्यंत तक्रार का दाखल केली नाही? मी आता अरुण जेटली यांनी आव्हान देतो. त्यांनी रॉबर्ट वढेरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून दाखवावी, असे दिग्विजयसिंह एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi