Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाजपेयींना ‘भारतरत्न’ प्रदान

वाजपेयींना ‘भारतरत्न’ प्रदान
नवी दिल्ली , शनिवार, 28 मार्च 2015 (10:31 IST)
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील बडे नेते देखील उपस्थित होते.
 
वाजपेयी हे 1998 ते 2004 या काळात ते सलग पंतप्रधानपदावर कार्यरत होते. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या काँग्रेसविरहित सरकारचे ते पहिले पंतप्रधान होते. 50 हून अधिक वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. नरेंद्र मोदी सरकारने वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. त्या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजुरी देत वाजपेयींना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येत असल्याची घोषणा 24 डिसेंबर 2014 रोजी टिटरवरून केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांचे सामाजिक योगदान, भारत-पाकिस्तान मैत्रीचे संबंध वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांचे साहित्यातील योगदान भव्य आहे.
 
दरम्यान, या पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासोबत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, गृहमंत्री राजनाथसिंह, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, जदयूचे अध्यक्ष शरद यादव उपस्थित होते.
 
वाजपेयींना पुरस्कार प्रदान केल्यानंतर भाजप कार्यकत्र्यांनी ठिकठिकाणी मिठाई वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi