Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वायुसेनेत हेरगिरी प्रकरणाचा छडा

वायुसेनेत हेरगिरी प्रकरणाचा छडा
नवी दिल्ली , गुरूवार, 21 जून 2012 (12:00 IST)
PR
PR
चीनच्या सीमेलगत पूर्वोत्तर क्षेत्रात भारतीय वायुसेनेच्या योजनांबाबत संवेदनशील माहितीची हेरगिरी करण्याच्या प्रकरणाचा छडा लागला आहे. एका जूनियर अधिकार्‍यास याप्रकरणात रंगेहाथ पकडण्यात आले.

वायुसेनेचा एक जूनियर वारंट अधिकारी पूर्वोत्तरात भारताच्या सज्जतेबाबत अंत्यंत संवेदनशील माहिती असलेली हार्ड डिस्क घेऊन जात असताना पकडल्या गेला. यामध्ये देशाच्या सुरक्षेस प्रभावित करणारी संवेदनशील माहिती होती.

वायुसेनेच्या प्रवक्त्या स्क्वाड्रन लीडर प्रिया जोशी यांनी याप्रकरणी अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्या अधिकार्‍यास आसाममध्ये बागडोगरा येथे पकडण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi