Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजय मल्ल्यांचा राजीनामा फेटाळला

विजय मल्ल्यांचा राजीनामा फेटाळला
दिल्ली : राज्यसभेच्या खासदारकीचा उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिलेला राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.
 
विजय मल्ल्या यांनी परदेशातून पत्रद्वारे राज्यसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र, राजीनाम्याच्या अर्जासोबत आवश्‍यक ती कागदपत्रे मल्ल्या यांनी जोडलेली नसल्याची बाब राज्यसभा अध्यक्षांनी पुढे केली आहे. यातल्या कोणत्याही कागदपत्रांवर मल्ल्या यांची स्वाक्षरी नाही, त्यामुळेच राजीनामा फेटाळल्याचं राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारींनी सांगितलं आहे. तांत्रिक कारणांमुळे राजीनामा फेटाळल्याचं अन्सारी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देश सोडून जाण्यास निलेश राणे यांना मनाई