Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधानसभा लढविणार नाही: मुंडे

विधानसभा लढविणार नाही: मुंडे

वार्ता

नवी दिल्ली , बुधवार, 15 जुलै 2009 (19:20 IST)
महाराष्ट्रात ऑक्टोंबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र भाजपचे प्रभारी गोपीनाथ मुंडे यांनी दिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई, कोकणपेक्षा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे मुंबई व कोकणावर आता लक्ष केंद्रीत करणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपला बहुमत मिळण्यासाठी संपूर्ण वेळ निवडणूक प्रचार मोहिमेस देणार असल्याचे गोपीनात मुंडे यांनी सांगितले.

भाजप आणि शिवसेना यांची युती सर्वात जुनी असून दोघंही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दोन्ही पक्षांचा जाहीरनामाही एक असणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi