Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे - मायावती

विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे - मायावती

वेबदुनिया

, गुरूवार, 12 मे 2011 (17:02 IST)
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे की ग्रेटर नोएडा येथे केलेले धरणे आंदोलन ही 'नौटंकी' होती. काँग्रेस व इतर विरोधी पक्ष भूसंपादनाबद्दल गैरसमज पसरवत असल्याचा आरोप देखील मायावतीने लावला आहे.

ग्रेटर नोएडातील भट्टा परसौल भागात सुरू असलेला वादाचा आणि भूसंपादनाचा काहीही संबंध नाही, असे मायावतींनी म्हटले आहे.

मायावती म्हणाल्या की, 'चुकीची माहिती व गैरसमज पसरवून विरोधी पक्ष कायदा आमि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांची दिशाभूल करत असून भट्टा परसौलमधील घटना हे हीन दर्जाच्या राजकारणाचे उदाहरण आहे.'

Share this Story:

Follow Webdunia marathi