Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शशिकला यांनी डीएमके खासदाराच्या श्रीमुखात भडकावली

शशिकला यांनी डीएमके खासदाराच्या श्रीमुखात भडकावली
दिल्ली , सोमवार, 1 ऑगस्ट 2016 (10:52 IST)
दिल्लीत विमानतळावर तामिळनाडूमधील एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा यांनी रागाच्या भरात सर्वांसमोर डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांच्या श्रीमुखात भडकावली.

शशिकला आणि  तिरुची या दोघांमध्ये  विमानतळावर वाद झाला. दोन्ही खासदारांची सीट एकाच एअरक्राफ्टमध्ये होती. जेव्हा डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांना याबाबत कळलं, तेव्हा त्यांनी शशिकला यांच्यासोबत प्रवास करण्यास नकार दिला आणि एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा यांना एअरक्राफ्टमधून उतरण्यास सांगितले. तिरुची शिवा यांच्या या भूमिकेमुळे शशिकला भडकल्या आणि त्यांनी रागाच्या भरात विमानतळावर सर्वांसमोर तिरुची यांच्या श्रीमुखात भडकावली. तिरुची यांनी आपला प्रवास रद्द करुन, शशिकला यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निघून गेले. मात्र, शशिकला चेन्नईच्या दिशेने रवाना झाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोनोरेल अडकली; प्रवासी लटकले!