Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शहीद जवानांबद्दल ओम पुरीचे बेताल वक्तव्य सेनेत कोणी जाण्यास सागितले

शहीद जवानांबद्दल ओम पुरीचे बेताल वक्तव्य सेनेत कोणी जाण्यास सागितले
, मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016 (13:44 IST)
सलमान खान आणि इतर बेतला लोकांच्या वक्तव्यानंतर आता जेष्ठ अभिनेते यांची मती भ्रष्ट झाली आहे. त्यांनी थेट आपल्या शहीद झालेल्या जवानांवर टीका केली आहे.  
 
सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुणी सांगितलं होतं. सैन्यात जायला आम्ही काय दबाव टाकला होता असं असंवेदनशील वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी केलंआहे.त्यामुळे पुन्हा एकदा  हे   सिने  अभिनेतेकिती  मूर्ख असतात हे  सिद्ध   झाले    आहे.   
 
एका  खासगी  वृत्तवाहिनीच्या  कार्यक्रमात ओम पुरी सहभागी झाले होते. तेव्हा भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी देशभरातून वेगवेगळे सल्ले का दिले जात आहे ? का पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली जात आहे ? असा प्रश्न केला असता, सरकारने पाक कलाकारांचा व्हिसा रद्द केला पाहिजे अशी मागणी ओम पुरींनी केली.
 
मात्र, त्यानंतर तावातावाने बोलणारे ओम पुरींनी शहीद जवानांवर असंवेदनशील वक्तव्य केलं. “देशामध्ये 15 ते 20 असे लोक आहे. ज्यांना बॉम्ब लावून पाकमध्ये पाठवता येईल. आपल्या तरुणांना सैन्यामध्ये भरती होण्याची कुणी जबरदस्ती केली होती. सैन्यामध्ये जाण्यासाठी कुणी सांगितलं होतं.”
 
ओम पुरी एवढ्यावर थांबले नाही. भारत, पाकिस्तान आणि इस्त्राईलला फिलिस्तानने बनवलंय असा जावाईशोधही लावला. देशातील मुस्लिम समाजाला भडकावू नये. देशातील अनेकांचे नातेवाईक पाकमध्ये राहतात, मग कसं युद्ध करायचं ? असा सवालच पुरींनी विचारला आहे. त्यामुळे  ओम पुरी किती बेताल  बोलत होते हे समोर आले आहे. मात्र हे सर्व प्रसिद्धी करिता  करतात का असाही प्रश्न  नेटीझन्स  करत आहे. प्रसिद्धी साठी असा प्रयत्न योग्य नसून  पुरी यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदा दिवाळीत 25 हजार कोटींची ऑनलाइन खरेदी