Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संघाची माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

संघाची माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (09:47 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माफी मागण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येस संघच जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांनी विधान केले होते. 
 
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिस्त्र आणि पी. सी. पंत यांच्या पिठाने माफी मागून हे प्रकरण मिटविण्याची सूचना केली होती. मात्र, वकील कपिल सिब्बल यांनी राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. आता या प्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. राहुल यांना 6 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. गतवर्षी ठाण्यातील सभेत राहुल गांधी यांनी संघावर हा आरोप केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi