Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय दत्तला माफी नको - आभा सिंग

संजय दत्तला माफी नको - आभा सिंग

वेबदुनिया

संजय दत्तची शिक्षा माफ करू नये. याप्रकरणी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम. काटजू यांनी दाखल केलेली विनंती मंजूर करू नये, अशी विनंती वकील व सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली. संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर प्रेस कौन्सिल ऑफ इ‍ंडियाचे अध्यक्ष एम. काटजू यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे संजय दत्तला शिक्षेत माफी द्यावी अशी विनंती केली. त्यामुळे, सर्वत्र हाच विषय चर्चिला जात आहे. यानिमित्ताने अॅड. आभा सिंग यांनी काटजू यांची मागणी मान्य करू नका, अशी विनंती राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi