Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजीव चतुर्वेदी, अंशु गुप्ता यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर

संजीव चतुर्वेदी, अंशु गुप्ता यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर
, बुधवार, 29 जुलै 2015 (12:51 IST)
IFS अधिकारी संजीव चतुर्वेदी, NGO गूंजचे संस्‍थापक अंशु गुप्‍ता यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड

अंशु गुप्ता आणि संजीव चतुर्वेदी या दोन भारतीयांचा रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. अंशु गुप्ता हे दिल्लीतील गुंज या एनजीओचे संस्थापक आहेत तर संजीव चतुर्वेदी हे एम्सचे सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. संजीव चतुर्वेदी यांनी एम्सच्या माजी मुख्य दक्षता अधिकारीपदी ही काम केलय.  

 समाजसेवा, सरकारी नोकरी, पत्रकारिता व कला तसेच नवं नेतृत्व या विभागांसाठी 'फिलिपिन्स' सरकारतर्फे आशियातील 'नोबेल पुरस्कार' मानला जाणारा ' रॅमन मॅगसेसे' हा पुरस्कार दिला जातो.

अंशु गुप्ता यांनी कॉर्पोरेट जगातील उच्च पदाची नोकरी सोडून १९९९ साली 'गुंज' नावाची स्वयंसेवी संस्था ( एनजीओ) स्थापन केली. नैसर्गित आपत्तीवेळी संकटग्रस्तांना, पीडितांना मदत करण्याचे महत्वाचे कार्य गुंजच्या माध्यमातून केले जाते. समाजसेवा व मावी दृष्टिकोनातून गरिबांना मदत करण्याचेही काम करणा-या 'गुंज'चे भारतातील २१ राज्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे.

यंदाचा पुरस्कार मिळालेले दुसरे भारतीय असलेले संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेतील अधिकारी असून सध्या ते 'एम्स'चे उपसचिव म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांच्याकडे 'एम्स'च्या दक्षता अधिकारपदाचा अतिरिक्त कार्यभारही होता, मात्र एम्समधील भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणल्यामुळे गेल्यावर्षी चतुर्वेदी यांच्याकडून तो कार्यभार काढून घेण्यात आला. भ्रष्ट अधिका-यांनी वरिष्ठांकडून जबाव आणल्यानेच चतुर्वेदींकडून कार्यभार काढून घेण्यात आला होता.

याआधी विनोबा भावे, प्रकाश आणि मंदाकिनी आमटे, नीलिमा मिश्रा आदी अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi