Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपूर्ण काश्मीर भारताचा आहे --- सरसंघचालक

संपूर्ण काश्मीर भारताचा आहे --- सरसंघचालक
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (10:57 IST)
आपल्या काश्मीरमधली परिस्थिती चिंताजनक आहे. पाकव्याप्त काश्मीरसमवेत संपूर्ण काश्मीर भारताचाच आहे. सरकार त्यासाठी काम करतंच आहे. पंतप्रधानांनी म्हटलं होतं की काश्मीरला विजयासोबतच विश्वासाची गरज आहे. फाळणीच्या वेळी काश्मीरमधे आलेल्या हिंदूंसोबत अन्याय होतो. त्यांची आता तिसरी पिढी आहे. मात्र, त्यांना अजूनही त्यांच्या नागरिकत्वाचे अधिकार नाहीत. काश्मिरातील उपद्रवकारी लोकांना चिथवण्याचं काम सीमेपलिकडून होतो.’ सरसंघचालक मोहन भागवतांनी ठणकावून सांगितलं आहे.
 
सर्जिकल स्ट्राईकनंतर सरकारला शाबासकी देणाऱ्या सरसंघचालकांनी आज अखंड काश्मीरची घोषणा केली. नागपूरमध्ये संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी मेळाव्यानंतर मार्गदर्शनात ते  बोलत होते.  सीमेपलिकडूनच काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचं काम  सुरु आहे. पण पाकव्याप्त काश्मीरसह अखंड काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचं मत  भागवत यांनी व्यक्त केल आहे.  एकीकडे गोरक्षकांना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे सल्ले दिले आहे. मात्र  गोरक्षकांना सुद्धा महत्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 90 वर्ष पूर्ण झाली. पंडीत दीनदयाळ उपाध्यायांची जन्मशताब्दी वर्षंही आहे. अध्यात्मामध्ये इतकी ताकद आहे. ज्यामध्ये जगातील सगळे पंथ आणि त्यांचे विचार त्यात सामावले जातील. विज्ञानाला सार्थकता गाठायची असेल तर त्याला अध्यात्माची जोड मिळावीच लागेल. असा विचार सरसंघचालकांनी मत व्यक्त केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्तशृंगी गडावर सुरक्षा रक्षकाकडून चुकून फायरिंग, आठ जण जखमी