Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संशयास्पद सापडलेल्या इराणी नागरिकांची नौका ताब्यात

संशयास्पद सापडलेल्या इराणी नागरिकांची नौका ताब्यात
अलापुझा , सोमवार, 6 जुलै 2015 (10:31 IST)
बारा इराणी नागरिक असलेली संशयास्पद नौका तटरक्षक दलाच्या जवानांनी ताब्यात घेतली आहे. केरळ येथील अलापुझा येथील समुद्रकिनार्‍यावर ही कारवाई करण्यात आली.

या नौकेवर असलेल्या १२ इराणी कर्मचार्‍यांना केरळ पोलिसांनी अटक केली असून त्यांना चौकशीसाठी विझिनजाम येथे नेण्यात आले आहे. या नौकेवर प्रतिबंधित उपग्रह फोन आढळल्याने संशय आल्याने कारवाई करण्यात आल्याचे तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. केरळ पोलिसांसह केंद्र आणि राज्य गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi