Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारच्या निर्णयाची मोदींनी खिल्ली उडवली!

सरकारच्या निर्णयाची मोदींनी खिल्ली उडवली!

वेबदुनिया

अहमदाबाद , गुरूवार, 30 जून 2011 (12:05 IST)
अहमदाबादमधील एका ठिकाणी अत्याधुनिक बस थांब्याचे आणि उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ पैशांची नाणी व्यवहारामधून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. रामदेवबाबा यांच्या काळ्या पैशाविरोधातील आंदोलनाला सरकारने अशा प्रकारे प्रतिसाद दिला आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया मोदी यांनी यासंदर्भात दिली.

केंद्र सरकारची काळ्या पैशाविरोधात लढण्याची अनिच्छा यामधून दिसून येते, असे मोदी म्हणाले. युपीए सरकारच्या प्रशासकीय क्षमतेबद्दल मोदी यांनी यावेळी शंका उपस्थित केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi