Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वपक्षीय बैठक टाळणार्‍या अडवाणींवर टिका

सर्वपक्षीय बैठक टाळणार्‍या अडवाणींवर टिका

भाषा

नवी दिल्ली , शुक्रवार, 5 डिसेंबर 2008 (20:17 IST)
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थित राहिल्याबद्दल मार्क्सवादी कम्य‍ुनिस्ट पक्षाने वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.

यामधून दहशतवादी हल्ल्यानंतर धार्मिक दुफळी वाढवून राजकीय फायदा उचलण्याचा भाजपच्या उद्देशावर शिक्कामोर्तब होत असल्याचे माकपने म्हटले आहे.

हल्ल्याची निंदा करून एकत्रितपणे दहशतवाद निपटून काढण्याच्या संकल्पात सहभागी न होता एकमताने पारीत करण्यात आलेल्या ठरावातून अंग काढल्याची टिका माकपचे मुखपत्र 'पीपल्स डेमॉक्रसी'त करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi