Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलग पाच दिवस बँका बंद!

सलग पाच दिवस बँका बंद!
मुंबई , सोमवार, 14 मार्च 2016 (09:59 IST)
येत्या 23 मार्च ते 27 मार्च यादरम्यान सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची कामं 23 मार्चाआधीच उरकून घ्यावी लागतील.
 
23 मार्चला होळी, 24 मार्चला धुलिवंदन आणि 25 मार्चला गुड फ्रायडे आहे, त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर 26 मार्च रोजी चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार, म्हणजे हे दोन दिवसही बँका बंद असतील.
 
बँका बंद असल्या तरी एटीएम सुरु असतील. मात्र, सलग पाच दिवस बँका बंद असल्याने एटीएमवर भार पडू शकतो आणि परिणामी एटीएम रिकामे होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना ऐनवेळी पैसै काढायचे असल्यास पंचाईत होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi