Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनिया यांची अण्णांना भेटण्याची शक्यता कमी!

सोनिया यांची अण्णांना भेटण्याची शक्यता कमी!

वेबदुनिया

नवी दिल्ली , गुरूवार, 30 जून 2011 (12:01 IST)
आज (गुरुवार) सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची अण्णा हजारे यांना भेटण्याची शक्‍यता कमी आहे. लोकपाल विधेयकाबाबत नागरी संघटनेची बाजू स्पष्ट करण्यासाठी हजारे गांधी यांची भेट घेणार आहेत.

हजारे यांच्या भेटीसाठी गांधी यांनी आज दिवसभरात कोणतीही वेळ राखून ठेवलेली नाही, असे गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १०, जनपथ येथून सांगण्यात आले.

लोकपाल विधेयकाच्या कार्यकक्षेमध्ये पंतप्रधानांचा समावेश करावा यासाठी गांधी यांचे मन वळविण्याचा आपण प्रयत्न करू, असे हजारे यांनी काल म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi