Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मृती इराणी जवानांना बांधणार रक्षासूत्र

स्मृती इराणी जवानांना  बांधणार रक्षासूत्र
दिल्ली , शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (11:52 IST)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 18 ऑगस्ट रोजी सियाचीन दौऱ्यावर जात असून, या दौऱ्यावेळी त्या सियाचीनमधील सरंक्षणासाठी तैनात जवानांना रक्षा सूत्र बांधणार आहेत. स्मृतीने ईराणींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जवानांना कृतज्ञता व्यक्त केली आहे.

इराणी यांनी भारतीय सैन्य दलाच्या शौर्यगाथेला अभिवादन करणारा संरक्षण मंत्रालयाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमधील गीताचे ‘तिरंगा जान है…’ असे बोल आहेत. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या सैन्य दलाच्या विविध प्रात्यक्षिकांसोबतच, शस्त्रास्त्रांचे शक्तीप्रदर्शनही दाखवण्यात आले आहे. यासोबतच मोदी सरकारचे विविध योजनांचे आणि धोरणांचे यश, याशिवाय तिन्ही दलांच्या धाडसी कार्याचाही आलेख मांडण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं