Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिमवषार्वात बेपत्ता झालेले जवान शहीद?

हिमवषार्वात बेपत्ता झालेले जवान शहीद?
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (11:08 IST)
नवी दिल्ली: सियाचेनमध्ये हिमवषार्वात सापडल्यावर बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे १० जवान शहीद झाल्याची शक्यता संरक्षण खात्याने वर्तवली आहे.
 
काल हे जवान गस्तीसाठी असलेल्या चौकीला काल सकाळी हिमवषार्वाने झोडपले, आणि एका फटक्यात ते बेपत्ता झाले.  हिमवषार्वाखाली गाडले गेल्यामुळे या जवानांशी असलेला रेडियो संपर्क तुटला आणि या घटनेची माहिती समजली. अत्यंत जोखमीचा हा भाग असून जवळपास २२००० फूट उंचीवर भारतीय लष्कराची प्रसिद्ध अशी बाना चौकी आहे.
 
मद्रास बटालियनचे ९ जवान आणि ज्युनिअर कमिशन आफिसर अशा दहा जणांचा वायुदलाची विमाने शोध घेत आहेत. हा अपघात १९,६०० फूट उंचीच्या नॉर्दर्न ग्लेशियर येथे घडला.

Share this Story:

Follow Webdunia marathi