Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‍महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

‍महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नवी दिल्ली , मंगळवार, 22 जुलै 2014 (15:12 IST)
देशाची राजधानी दिल्लीत महिलांच्या अत्याचारांच्या  घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी दिल्ली परिवहन  मंडळातर्फे (डीटीसी) शहरात धावणार्‍या सर्व प्रवासी बसमध्ये  लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे.
 
महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी डीटीसीने पहिल्या  टप्प्यात 200 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची घोषणा केली  आहे. दिल्लीत सध्या 1157 सिटी बसेस आहेत. टप्प्याटप्याने  सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रवाशांवर लक्ष ठेवले जाणार  आहे.

दरम्यान, 16 डिसेंबर 12 रोजी दिल्लीत एका मेडिकलच्या  विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहीक बलात्कार  केला होते. तसेच तिच्यासह त्याला मित्राला धावत्या बसमधून खाली  फेकून दिले होते. पीडितेच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती.  अखेर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. परंतु  तिचा मृत्यु झाला होता. या पार्श्वभूमीवर डीटीसीने प्रत्येक बसमध्य  मध्यरात्री दोन सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार असल्याचेही म्हटले  आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi