Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कडकडीत बंद’मुळे सामान्यांचे हाल

‘कडकडीत बंद’मुळे सामान्यांचे हाल
मुंबई , बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:23 IST)
केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध देशातील प्रमुख कर्मचारी केंद्रीय संघटनांनी आज कडकडीत बंद पुकारला आहे. यामध्ये बॅँकांचा सहभाग असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
 
बेस्ट, रेल्वे, एसटी, टॅक्सी, रिक्षा संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असला, तरी ते यामध्ये सहभागी होणार नसल्याने काहीसा दिलासा असला तरी बॅँका बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. ५६ प्रादेशिक बँका आणि ६५० ग्रामीण बँकांचे जवळपास १३ लाख कर्मचारी आणि अधिकारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
 
कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल रद्द करणे, किमान वेतन पंधरा हजार रुपये करणे, समान कामाला समान वेतन, सार्वजनिक क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक नको, बेरोजगारी व महागाईला आळा घाला आणि उद्योगांना सवलती देताना नोकर्‍यांची अट यासारख्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशातील कामगार संघटनांनी हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या बंदमध्ये सहभागी होणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi