Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘घर वापसी’ला सरकारचा पाठींबा आहे का? : उद्धव ठाकरे

‘घर वापसी’ला सरकारचा पाठींबा आहे का? : उद्धव ठाकरे
दिल्ली , सोमवार, 22 डिसेंबर 2014 (12:27 IST)
हिंदुत्वाच्या नावाने देशभरात धर्मांतरणाचा जागर सुरू आहे. त्यास खरोखरच सरकारचा पाठिंबा आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे, असा संशय  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यक्त केला आहे.
 
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये भाष्य करताना म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा या संघटना धर्मांतराचे स्वागत करत असून भाजपामधील मोठा वर्ग धर्मांतराच्या बाजूने आहे, पण सत्तेवर असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.
 
हिंदूत्ववादी संघटनांनी परस्पर जे उपक्रम चालवले आहेत त्यामुळे मोदी सरकारला तोटा होईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. जगभरात तलवार आणि पैशाचा वापर करुन धर्मांतर होत आहे. आता फक्त गंगा उलटी वाहू लागल्यावर निधमीर्वाद्यांनी धर्मांतर योग्य नसल्याची आवई उठवली आहे अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi