Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'नायक' संजय कसा ठरला खल'नायक'?

'नायक' संजय कसा ठरला खल'नायक'?
, गुरूवार, 21 मार्च 2013 (17:37 IST)
संजय दत्त... एक यशस्वी अभिनेता, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नरगिस व अभिनेता संसदपटू सुनील दत्त यांचे सुपूत्र, खासदार प्रिया दत्तचा भाऊ. वडिलो‍पार्जित मिळालेली प्रसिद्धी व धनदौलत मिळाल्यानंतरही हा नायक शेवटी खलनायक बनून आपल्याच मुंबईचा गुन्हेगार कसा ठरला, जाणून घ्या रील लाइफमधील नायकाची रियल लाइफ कहानी...
FILE


कँसरने आई नरगिसला हिरावून घेतल्यापासूनच संजय दत्त मादक द्रव्यांचा आधार घ्यायला लागला होता. पहिला चित्रपट 'रॉकी'च्या यशानंतर संजय मादक द्रव्यांच्या नशेत पुरता बुडाला होता. सुनिल दत्त यांनी संजयला अमेरिकेत व्यसनमूक्ती केंद्रात उपचार देऊन यातून सोडवले. यानंतर ड्रग्जला रामराम करून संजयने बॉलीवुड गाजवायला सुरूवात केली.

मात्र नियतीस संजयचे सुखद जीवन मान्य नसावे. संजयची अर्धांगिनी ऋचा हिस मेंदूचा कर्करोग झाल्यानंतर दीर्घ आजाराने ती अनंताच्या प्रवासास निघून गेली. निराश संजयने संपूर्ण लक्ष चित्रपट कारकीर्दीवर केंद्रित करून १९८९ ते १९९३ पर्यंत पाठोपाठ सुपरहिट चित्रपट दिले. यामध्ये थानेदार, साजन, सडक आणि खलनायक ईत्यादींचा समावेश आहे.

मात्र दुर्भाग्याने पाठ सोडली नाही, पुढील पानावर...

webdunia
FILE
मुंबईत झालेल्या दंगलीमुळे संजय चिंताग्रस्त होता, त्याच्या कुटुंबीयास धमक्या देण्यात येत होत्या. संजयचे परिचित मॅग्नम व्हिडिओ कंपनीचे मालक समीर हिंगोरा व हनीफ कडावाला त्याच्या घरी आले. सोबत दाऊद इब्राहिमचा खास व्यक्ति अबू सालेम होता. त्याने सुरक्षेसाठी काही शस्त्र देत असल्याचे सांगून एके ४७ रायफल दिली.

यानंतर १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले, यामध्ये शेकडो जणं मृत्युमूखी पडले. याप्रकरणी १५० जणांना अटक झाली, यामध्ये धक्कादायक अटक होती ती संजय दत्त याची.

या दिवसांमध्ये संजय 'खलनायक' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यवस्त होता, हाही एक संगोगच म्हणावा लागेल. १५ एप्रिल १९९३ मध्ये एका वृत्तपत्रातून संजय दत्तचे नांव सामोरे आल्यापासून पोलिसांवर करवाईचा दबाव आला होता.

बॉम्ब स्फोटांशी काहीही संबंध नसल्याचे संजयने वारंवार स्पष्ट केले. मात्र संजयसमोर हिंगोरा व कडावाला यांना आणण्यात आल्यानंतर मुंबई हल्ल्यासाठी आणण्यात आलेल्या रायफल्सपैकी एक संजयला दिल्याचे सांगितले.

संजय कसा फसला, पुढील पानावर...

webdunia
FILE
यापैकी फक्त एक रायफल व पिस्तूलच आपण घेतले होते, बाकीचे परत केल्याचे त्याने सांगितले. आणि जवळ ठेवलेली रायफल नष्ट करण्यासाठी भिंडी बाजारातील मित्र युसूफ नलवाला यांस दिल्याचे सांगितले.

नलवाला व संजय बालपणापासूनचे मित्र होते. शिकारीसाठी दोघेही सोबत जायचे. गुन्हे शाखेच्या चौकशीत नलवाला याने रायफल लोखंड फॅक्टरीतील एका व्यक्तिस दिली व त्याने ती नष्ट केल्याचे उघड झाले. मात्र रायफलचे स्प्रिंग सुरक्षित सापडले. तो संजयविरूद्ध सबळ पुरावा मानल्या गेला.


संजय दत्तने पिस्तूल सुद्धा परत केले होते. अजय मारवाह कडून पोलिसांनी ते जप्त केले. मारवाह नंतर पुराव्याअभावी सुटला. गुन्हे शाखेने समुद्रकिनार्‍यावरून ५३ काडतूस गोळा केले आणि संजय दत्त विरूद्ध पुरावे म्हणून सादर केले. नंतर खटला सीबीआयकडे स्थानांतरित झाला. संजयला शस्त्रास्त्र कायद्याअंर्तगत सहा वर्षांची शिक्षा झाली.

संजय शिक्षेविरूद्ध सवौच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने एक वर्षाची सूट देत ५ वर्षाची शिक्षा कायम ठेवली. याअगोदर त्याने 18 महिने तुरूंगात घातले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi