Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, लष्कर कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

1-terrorist-killed-in-the-encounter-at-gund-brath-area-of-sopore
, सोमवार, 21 जून 2021 (09:22 IST)
जम्मू-काश्मीरच्या शोपोरमध्ये रात्रीपासून चाललेल्या जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे.
 
काश्मीरचे पोलिस प्रमुख विजय कुमार म्हणाले की, दहशतवादी मुदासिर पंडितवर तीन पोलिस, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांचा बळी घेण्याचा आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर सीमा संबंधित अनेक गुन्ह्यांचा देखील आरोप होता.
 
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफची संयुक्त पथके सोपोर भागात संयुक्त कारवाई करीत आहेत. 12 जून रोजी सोपोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे ऑपरेशन केले जात आहे. या हल्ल्यात दोन पोलिस आणि दोन नागरिकांचा जीव गमावला होता.
 
हल्ल्याला लष्कर-ए-तैयबा जबाबदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 12 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवाद्यांपैकी मुदासीर पंडित हादेखील होता अशी माहिती विजय कुमार यांनी दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Price Review: सोने 9000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले, ते आणखी खाली येईल की वाढेल? तज्ञांचे मत जाणून घ्या