Publish Date: Mon, 07 Nov 2016 (10:56 IST)
Updated Date: Mon, 07 Nov 2016 (10:59 IST)
दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे. २० ते २३ मार्चला सलग परीक्षा आल्यामुळे पालक व विद्यार्थी नाराज झाले होते. याविषयी आमदार कपिल पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. दोन विषयांच्या परीक्षेमध्ये किमान एक दिवसाचे अंतर असावे अशी विनंती त्यांनी केली होती. त्यावर शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी शिक्षण मंडळाला हे आदेश दिले आहेत. यात २० ते २३ मार्च दरम्यान होणार्याा विषयांच्या परीक्षांदरम्यान आता सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.