Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंद नाही पडणार 100 आणि 50 च्या नोटा

बंद नाही पडणार 100 आणि 50 च्या नोटा
नवी दिल्ली- सरकारने स्पष्ट केले की 100 आणि 50 रुपय्यांच्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा अफवा असून असे काही अमलात आण्याचा विचार नाही. सरकारने ट्विटरवर सूचित करून अश्या चर्चेला अफवा करार दिले ज्यात सांगण्यात येत आहे की पंतप्रधान 100 आणि 50 च्या नोटा अवैध घोषित करणार आहे.
पत्र सूचना कार्यालयाने ट्विटरवर लिहिले की हे आधारहीन आहे. कोणत्याही इतर राशी मुद्रेवर बंदी घालण्यावर विचार नाहीये. हे काल्पनिक असून हेही सांगण्यात आले आहे की नोटांवर बंदीचे फायद्याच्या तुलनेत लागत अधिक आहे.
 
त्यात हेही सांगण्यात आले की बँक लॉकर सील करणे आणि सोने- हिर्‍याचे दागिने कुर्क करण्याचा विचार नाही. 2000 च्या नोटांची गुणवत्ता आणि रंग उतरण्याच्या तक्रारीवर सरकारने म्हटले की यात काळजी करण्यासारखे काही नाही कारण ही नोटची सुरक्षा विशेषता आहे. ही गोष्टही नाकारण्यात आली की 2000 च्या नोटमध्ये चिप लागलेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोटबंदी : आता 4500च्या जागेवर 2000 रुपयेच बदलू शकता, ह्या आहे 8 नवीन घोषणा