Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्ञानवापी मशीद ही हिंदू मंदिर असल्याचे 15 पुरावे

Kashi Vishwanath Gyanvapi masjid
, शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:42 IST)
Gyanvapi Mashid Survey Case  वाराणसी जिल्हा न्यायलयच्या आदेश नंतर ज्ञानवापी परिसर आणि तळघराचा वैज्ञानिक सर्व्हे झाला. सर्व्हेमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला ही इमारत किती जूनी आहे आणि या मागचे खरे कारण काय? पुराव्यांच्या आधारावर वाराणसी जिल्हा न्यायालयाने 31 जानेवारी 2024 बुधवार या दिवशी ज्ञानवापी बद्द्ल एक मोठा निर्णय देतांना व्यास तळघरात हिंदू पक्षाला नियमित पूजेचा अधिकार दिला. जिल्हा प्रशासनाला सात दिवसात याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. इथे 1993 पर्यंत पूजा होत होती. त्या नंतर ही पूजा बंद केली गेली. 
 
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या रिपोर्ट मध्ये सांगितले की, परिसरात मंदिर असलेले पुरावे लपवण्याचे प्रयत्न केले गेले, तरी पण ते नष्ट केले जाऊ शकत नाही. जीपीआरने काढलेल्या माहितीच्या आधारावर तळघरात 2 मीटर रूंदीची विहिर पण आहे. सर्व्हे टीम मध्ये मुस्लिम समुदायाचे पण दोन पुरातत्वविद डॉ इजहार आलम हाशमी आणि डॉ आफताब हुसैन सहभागी होते. ASI ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की वैज्ञानिक अध्ययन, सर्वेक्षण, वास्तुशिल्प, अवशेषांचे अध्ययन, कलाकृती, शिलालेख, कला आणि मूर्ती यांच्या आधारावर सांगितले जावु शकते की तिथे असलेल्या संरचना निर्मितीच्या पाहिले इथे एक विशाल मंदिर होते. 
 
 
1. व्दार  परिसरात असलेल्या विशाल मंदिरात एक मोठा केंद्रीय कक्ष होता ज्याच्या पश्चिम प्रवेश व्दाराला दगडी बांधकामाने बंद केले आहे मुख्य दारावर प्राणी आणि पक्षांचे नक्षीकाम आणि तोरण आहे. ललाटच्या खांबाला नक्षिदार करत काही भाग दगड, विटा आणि गार्याने झाकलेला आहे. मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण हॉलच्या मेहराबदार प्रवेशव्दराला अवरुद्ध केले आहे आणि त्यांना बदलण्यात आले आहे. उत्तर दिशेच्या प्रवेश व्दारावर छाताकडे जाणार शीडी आज देखील वापरली जाते. छताकडे जाणारे दक्षिण प्रवेशवदाराला दगडाने बंद केले आहे.
 
2. अवशेष  तळघरात आणि परिसरात असलेल्या मूर्तींचे अवशेष इमारतीत पहिल्या पासून असलेल्या संरचनावर काढलेली प्राण्यांची आकृती होती. 17 व्या शतकातील मशीदीसाठी हे ठीक नव्हते. यासाठी यांना काढून टाकण्यात आले. तरी पण अवशेष अजून आहेत. मशिदिचा विस्तार आणि स्तंभयुक्त वराड्यांच्या निर्माणसाठी पहिल्या पासून असलेले मंदिराचे काही भाग जसे की खांब, भिंतस्तंभ इतरांचा उपयोग खूप कमी केला आहे. पहिल्या पासून स्थापित असलेले मंदिर पश्चिम भींत दगडाने बनलेली आहे आणि पूर्ण पणे सुसज्जित केली आहे.
 
3. प्रतीक चिन्ह  सर्व्हे दरम्यान मिळालेला शिलालेख, जे संस्कृत भाषेशी जुळत आहे. केंद्रीय कक्षाचा कर्ण-रथ आणि प्रति-रथ पश्चिम दिशेच्या दोन्ही बाजूनी दिसतो. सर्वात महत्वपूर्ण चिन्ह स्वस्तिक आहे. मोठे प्रतीक जसे शंकरांचे त्रिशूल पण आहे जे सांगतात की सर्व्हे टीमला मशीदीच्या तीन खोल्यांमध्ये सर्प, कलश, घंटा, स्वस्तिक, त्रिशूल आणि ॐ हे चिन्ह सापडले. यात मगराचे चिन्ह आहे. जिथे नमाज वाचली जाते तिथे प्रत्येक भिंतीवर श्री, ॐ इतर बरेच काही लिहलेले आहे. 
 
4. मूर्ती मिळाल्यात  ज्ञानवापी तळघरात आणि परिसरात श्रीहरि विष्णु आणि गणेशजींच्या मुर्तींसोबत शिवलिंग पण मिळाले आहे. यासोबत एक मुर्तीचा हात आहे जो कोपर मध्ये वाकलेला आहे. हात असा वाकलेला आहे जसे काही धरून ठेवले आहे.
 
5. नंदी  तिथे एक विशालकाय नंदी आहे ज्याचे तोंड मशीदीच्या दिशेने आहे यामुळे हे सिद्ध होते की शिवलिंग ज्ञानवापी मशीदीच्या वजुखान्यात कुठेतरी स्थित होते. वजुखान्यात मिळालेल्या शिवलिंगाला मुस्लिम पक्ष फव्वारा सांगत आहे. मंदिर-मशीदीच्या मध्ये लोखंडाची ग्रील लावलेली आहे. सांगितले जात आहे की त्या दगडापासून नंदीची दूरी ८३ फिट आहे जो त्याच बाजूला बघत आहे. सांगतात की तळघरात १२ फुट आणि ८ इंचचे शिवलिंग आहे. 
 
6. मशीदीची भींत  मशीदीच्या मागे बाहेरील भिंतीवर स्पष्टरूपाने हिंदू शैली बनलेली आहे. ही भिंत पूर्ण मंदिरासारखी आहे. ज्ञानवापी मशीदीच्या पश्चिम भिंतीवर घंटीच्या आकृत्या आहे.
 
7. श्रृंगार गौरी आणि गणेश मूर्ती  ज्ञानवापी मशीदीच्या परिसरात माता श्रृंगार गौरी आणि गणेशांच्या मुर्तीचे असणे या गोष्टीचा पुरावा आहे की तिथे एक मंदिर होते. ज्ञानवापी परिसरात माता श्रृंगार गौरी, भगवान गणेश, हनुमान, आदिविश्वेश्वर, नंदीजी आणि अन्य देवीदेवतांची प्रतिमा आहे. 
 
8. ज्ञानवापी विहिर  मशीद आणि विश्वनाथ मंदिराच्या मध्ये १० फुट खोल विहिर आहे ज्याला ज्ञानवापी म्हंटले जाते या विहिरि वरून या मशीदीला नाव पडले. स्कंद पुराणात सांगितले आहे की भगवान शंकरांनी स्वयं लिंगाभिषेकसाठी आपल्या त्रिशूलने ही विहिर बनवली होती. 
 
9. ज्ञानवापीचा अर्थ  सांगतात की विहिरीचे पाणी खूप पवित्र आहे ज्याला सेवन केल्याने व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते. ज्ञानवापीचा अर्थ आहे ज्ञान+वापी म्हणजे ज्ञानाचा तलाव. ज्ञानवापीचे जल श्री काशी विश्वनाथ वर चढवले जाते. 
 
10. औरंगजेबच्या दरबारचे दस्तऐवज  हे पण सांगितले जाते की औरंगजेबच्या दरबाराचे दस्ताऐवज मध्ये हे मंदिर असल्याचा उल्लेख आहे. यासोबतच दस्तऐवज मध्ये मंदिर पडण्याचा पण उल्लेख आहे. 
 
11. मशीदीचा घूमट  ज्ञानवापी मशीदीचे आर्किटेक्चर मिश्रण आहे मशीदीच्या घूमट खाली मंदिरच्या स्ट्रक्चर सारखी भिंत दृष्टीस पडते आणि मशीदीचे खांब पण हिंदू शैली मध्ये बनलेले आहे. ज्ञानवापी मशीदीचा  मुख्य घूमटाखाली पण एक घूमट आहे. दोघांमध्ये ६ ते ७ फुट अंतर आहे. खालच्या घूमटला घूमट नाही म्हणता येणार कारण तो एक शंकु आकार आहे. असे हिंदू स्थापत्य शैलीतच बनते घूमटच्या खालच्या जो भाग आहे ते मंदिराचे मूळ स्ट्रक्चर आहे. 
 
12. औरंगजेबने मंदिर तोडून मशीद बनवली  १९९१ मध्ये कशी विश्वनाथ मंदिराचे पुरोहितांचे वशंजने वाराणसी सिविल कोर्टात याचिका दाखल केली. याचिकेत सांगितले की मूळ मंदिरला २०५० साल पूर्वी राजा विक्रमदित्यांनी बनवले होते. १६६९ मध्ये औरंगजेबने याला तोडून मशीद बनवली. याचिकेत सांगितले की मशीदीमध्ये मंदिराच्या अवषेशांच्या वापर झाला आहे. यासाठी ही जमीन हिंदू धर्माला परत करावी. वादी पक्षाचा दावा आहे की स्थापित असलेली ज्ञानवापी आदि विश्वेश्वराचे मंदिर आहे. ज्याचे निर्माण २०५० वर्षा पूर्वी राजा विक्रमादित्यांनी केले होते. 
 
13. मंदिराच्या तोडलेल्या भागपासून बनवली मशीद  काशी विश्वनाथ मंदिराच्या तोडलेल्या भागातून मंदिराचे चिन्ह आणि गर्भगृहामध्ये शिवलिंग असल्याची चर्चा नेहमी झाली आहे ब्रिटिश लायब्ररी, लंडन, लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, वाशिंगटन जे पॉल गेट्टी म्युझियम, केलिफोर्निया इत्यादि विदेशी फोटोग्राफर द्वारे सन १८५९ ते १९१० चे मध्य घेतले गेले. ज्ञानवापीचे अनेक चित्र संग्रहित आहे. एक विदेशी फोटोग्राफर सैमुअल बॉर्न व्दारा फोटो १८६३-१८७० दरम्यान घेतले गेले होते. याच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की 'ज्ञानवापी हा ज्ञानाची विहिर, बनारस.' फोटोट हनुमानजींची मुर्ती, घंटा तसेच खंबांचे नक्षी काम दिसत आहे. 
 
14. विशेश्वरचे स्वयंभू ज्योतिर्लिंग  ज्ञानवापीला घेउन हिंदू पक्षाचे म्हणणे आहे की ज्ञानवापी विवादित चौकटीच्या जमीनी खाली १०० फूट ऊंच आदि विशेश्वरचे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. विवादित चौकटीच्या भिंतींवर देवी देवतांचे चित्र आहे. सध्याच मशीदीच्या सर्व्हे मध्ये हा खुलासा झाला की तळघरात एक शिवलिंग आहे तसेच तळघरात स्तंभावर मुर्ती अंकित आहे. तिथे खूप मुर्त्या आणि कलश असल्याचे सांगितले जात आहे 
 
15. अष्टकोणीय स्तंभ  तेथील स्तंभ अष्टकोणीय बनले आहे जे हिंदू मंदिरात असतात. मशीदीकडे तोंड करून बसलेला नंदी या गोष्टीचे प्रमाण आहे की तिथे शिवलिंग आहे. मशीद परिसरात स्थित श्रृंगार गौरी मंदिराचे असणे या गोष्टीचा पुरावा आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली