नवरात्रीच्या उत्सवा दरम्यान देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हफ्ता जारी केला.
या कालावधीत, सरकारने देशातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे 20 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली आहे. वेबकास्टच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटी शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आज संपली.18 व्या हप्त्याचा लाभ मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.
देशातील लहान आणि अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकारने 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते.
सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपयांची आर्थिक मदत जारी करते. प्रत्येक हप्त्याअंतर्गत, 2,000 रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाते, जी चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविली जाते.