Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1941 मधील नेताजींची मोटार सुरू होणार

1941 मधील नेताजींची मोटार सुरू होणार
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2016 (10:42 IST)
कोलकाता- ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवलनंतर ज्या मोटारीतून 1941 साली नेताजी सुभाषचंद्र बोस आजोळच्या घरातून निसटले होते ती आता पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचे वारसदार प्रयत्न करीत आहेत. नेताजी रिसर्च बूरोचे अधिकारी म्हणाले की, जर्मनीतील ऑडी या मोटार उत्पादक कंपनीने चार दरवाजांची जर्मन ‘वाँडरर शेदान’ ही नेताजींच्या आजोळच्या घरी सध्या असलेली मोटार पुन्हा एकदा कार्यरत करण्यासाठी कंबर कसली आहे.
 
कंपनीने आता ही मोटार जुने स्पेअरपार्टस् बदलून व रंगवून चालू स्थितीत आणण्याचे ठरविले आहे. नेताजी रिसर्च बूरोचे सचिव कार्तिक चक्रवर्ती यंनी सांगितले की, आम्हाला ही कार 100 ते 200 मीटर्पत चालवून पाहायची आहे. मोटारीचे काम डिसेंबपर्यत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

नेताजी यांनी 1941 मध्ये जानेवारी महिन्यात कोलकाता ते गोमाह (झारखंड) येथपर्यत बीएलए-7169 ही मोटार चालविली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैदराबाद मुक्ती दिन तेलंगणा राष्ट्रीय समितीला अमान्य