Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

20 rupees food in train चालत्या रेल्वेमध्ये Whatsapp वर बुक करा स्वस्त जेवण, IRCTC ची रेल्वे प्रवाशांसाठी ऑफर

20 rupees food in train चालत्या रेल्वेमध्ये Whatsapp वर बुक करा स्वस्त जेवण, IRCTC ची रेल्वे प्रवाशांसाठी ऑफर
, गुरूवार, 11 एप्रिल 2024 (12:32 IST)
रेल्वे प्रवासदरम्यान लोकांना रेल्वेत मिळणाऱ्या महागड्या जेवणाबद्दल तक्रार असते. जेवण महाग असल्याने लोक रेल्वे मधील जेवण घेणे टाळतात.भारतीय रेल्वेने या समस्येचे समाधान शोधले आहे. आता तुम्ही फक्त 20 से 50 रुपयांमध्ये रेल्वे मध्ये व्हॅट्सऍपवर जेवण मागवू शकतात. तसेच पोटभर जेवण करू शकतात. 
 
20 ते  50 रुपयात मिळतील जेवणाचे पॅकेट- 
भारतीय रेल्वेने लोकांची समस्या समजून घेऊन जेवणाचे पॅकेट उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा त्या लोकांना अधिक होईल, जे लांबचा प्रवास करत असतील. असे यासाठी कारण लांबचा प्रवास करणाऱ्या लोकांना जेवणासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. 
 
जेवणात काय मिळेल- 
याचे 50 रुपयाच्या पॅकेटमध्ये तुम्हाला 350 ग्राम जेवण दिले जाईल.  यामध्ये ऑर्डर दिल्यावर राजमा-भात, पाव भाजी, पुरी -भाजी, छोले-भात आणि मसाला डोसा सारखे पदार्थ मिळतील. याची ट्रायल सध्या देशामधील 64 मोठया रेल्वे स्टेशनवर सुरु आहे. 
 
व्हाट्सऐपच्या माध्यमातून करू शकतात ऑर्डर-
व्हाट्सएपच्या माध्यमातून चालत्या रेल्वेमध्ये जेवण ऑर्डर करू शकतात. याकरिता व्हाट्सएप वर रेल्वेमित्रचा ऑर्डर करावे लागेल. 8102888222 या व्हाट्सऐप वर ऍड केल्यानंतर या नंबरवर जेवण मागवू शकतात. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1.5 क्विंटलची सुवर्ण रामायण राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित