Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नविन वर्षात २०१६ च्या तुलनेत सुट्यांचा चांगलाच योग

नविन वर्षात २०१६ च्या तुलनेत सुट्यांचा चांगलाच योग
, सोमवार, 19 डिसेंबर 2016 (17:30 IST)
नवीन वर्षात चाकरमान्यांना सर्वाधिक सुट्याचा लाभ घेता येणार आहे. २०१७ मध्ये एकाही रविवारी शासकीय सुटी आली नाही. यामुळे चाकरमान्यांना दिवाळीसह २३ शासकीय सुट्यांचा आनंद घेता येणार आहे. २०१६ मध्ये बहुतांश सार्वजनिक सुट्या रविवारी आल्यामुळे चाकरमान्यांना सुट्यांचा आनंद घेता आला नाही.  २०१७ मध्ये एकूण ५३ रविवार आले असून यात एकाही रविवारी सार्वजनिक सुटी आली नाही. यामुळे ५३ सुट्यांसह अन्य सुट्यांचाही नवीन वर्षात आनंद घेता येणार आहे. तसेच २ सार्वजनिक  आणि २० शासकीय सुट्यांही मिळणार असून बहुतांश सण, उत्सव शुक्रवारी, सोमवारी आले आहेत. यामुळे दुसरा किंवा चौथा शनिवार रविवार अशा सलग तीन सुट्यांचा आनंदही चाकरमान्यांना घेता येणार आहे. दोन सार्वजनिक सुट्यांत एक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन गुरुवारी असून १५ आॅगस्ट स्वातंत्रदिन मंगळवारी आला आहे. एकंदरीत यंदा रविवार सोडून सार्वजनिक शासकीय सुट्या आल्याने २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये सुट्यांचा चांगलाच योग जुळून आला आहे. 
 
सर्वाधिक उत्सव सोमवारी :२४ फेब्रुवारीला शुक्रवारी महाशिवरात्री आहे. सोमवार, १३ मार्चला धुलीवंदन, मंगळवारी २८ मार्चला गुढीपाडवा, मंगळवार एप्रिल श्रीराम नवमी, एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गुडफ्रायडे शुक्रवारी १४ एप्रिल रोजी आहे. मे महाराष्ट्र दिन सोमवारी, १० मे रोजी बुध्दपौर्णिमा बुधवारी, २६ जून रोजी रमजान ईद सोमवारी, १५ आॅगस्ट हा मंगलवारी आला आहे, १७ आॅगस्टला पतेती गुरुवारी, २५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थी शुक्रवारी, सप्टेंबर रोजी बकरी ईद शनिवार, ३० सप्टेंबर दसरा शनिवार, आॅक्टोबर गांधी जयंती सोमवारी, यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत नोव्हेंबर शनिवार रोजी गुरुनानक जयंती, डिसेंबर शुक्रवार रोजी ईद मिलाद, २५ डिसेंबर सोमवार रोजी ख्रिसमस अशा सुट्या आहेत. 
 
दिवाळीत सलग चार सुट्यांचा आनंद 
२०१७ मध्ये दिवाळी आॅक्टोबर महिन्यामध्ये असून १९ आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन गुरुवारी, २० आॅक्टोबर बलिप्रतिपदा शुक्रवार, २१ आॅक्टोबर भाऊबीज शनिवार, अशा सलग सुट्या आल्या आहेत. यासह रविवारच्या सुटीचा आनंदही नोकरदार वर्गाला घेता येईल. त्यामुळे चाकरमान्यांना सुट्यांचे नियोजन करता येईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्मचारी भविष्य निधीच्या व्याज दरात घट