Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

26/11 मुंबई हल्ला : दहशतवादी कसाब हून फक्त 10‍ फिट दूर होता तो व्यक्ती, सांगितली ती भयावह रात्रीची कथा...

26/11 मुंबई हल्ला : दहशतवादी कसाब हून फक्त 10‍ फिट दूर होता तो व्यक्ती, सांगितली ती भयावह रात्रीची कथा...
, सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (12:12 IST)
मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्लाचे आज 10 वर्ष पूर्ण झाले आहे. अमेरिकेने या हल्ल्याचे गुन्हागार दहशतवाद्यांची माहिती देणार्‍यांना 50 लाख डॉलर इनाम देण्याची घोषणा केली आहे. आज देखील या हल्ल्याचे साक्षी असलेले लोक त्या भयावह क्षणांची आठवण करून कापतात. 10 वर्षांनंतर देखील त्यांचे जखमा अद्याप ही ताज्या आहे.   
 
कामा आणि अल्बलेस दवाखान्यात ड्यूटीवर तैनात चौकीदार कैलाश घेगडमल आज देखील त्या क्षणाची आठवण करून थरथरतात जेव्हा ते आणि त्याचे जोडीदार दहशतवादी कसाबच्या फक्त 10 फीटच्या अंतरावर असून कसाबने दुसर्‍या गार्डची गोळी घालून हत्या करून दिली होती.  
 
हे दहशतवादी जवळच असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये 52 लोकांची हत्या करून दवाखान्याकडे वळले होते. कैलाशने सांगितल्याप्रमाणे त्याचा साथी बब्बन वालूने गोळ्यांची आवाज ऐकल्यानंतर दवाखान्याचे सर्व दार बंद करण्याचे काम सुरू केले, पण वालू अंधाधुंध गोळ्या झाडत असलेल्या दहशतवाद्यांच्या निशाणा बनले. हे सर्व बघून ते एका झाडामागे लपले आणि फक्त 10 फिटाच्या अंतरावर त्यांनी बघितले की कसाब कसे लोकांवर गोळ्या झाडत होता.  
 
कैलाश यांनी सांगितल्या प्रमाणे इमारतीचे मुख्य दार उघडे होते आणि दहशतवाद्यांनी तिकडे धाव घेतली आणि तेथे दंडा हातात घेतलेल्या दुसरा गार्ड भानु नारकरवर गोळ्या झाडल्या. त्यांनी सांगितले की आधी असे वाटले की हा गैंगवारचा प्रकार आहे पण जेव्हा नारकर यांना त्यांच्या डोळ्यादेखी कसाब ने मारले तेव्हा कळले हे काही वेगळेच प्रकरण आहे.  
 
दवाखान्यातील परिसरात प्रवेश केल्यानंतर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी अंधाधुंध गोळीबार सुरू केला होता. यामुळे कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक फार घाबरले होते. नंतर कैलाश हिंमत दाखवत पोलिस टीमला सहाव्या माळ्यावर घेऊन गेले, जेथे त्यांची दहशतवाद्यांशी मुकाबला झाला आणि यात दोन पोलिसकर्मी ठार झाले असून आयपीएस अधिकारी सदानंद दाते जखमी झाले होते.  
 
नर्स मीनाक्षी मुसाले आणि अस्मिता चौधरी यांनी सांगितले की त्यांनी फ्रीज, एक एक्सरे मशीन, औषधांची ट्रॉली आणि खुर्च्यांचा वापर करून दुसर्‍या माळ्याचे दार बंद केले ज्याने दहशतवादी आत येऊ नये. सुनंदा चव्हाण म्हणाला, मुलं आणि त्यांच्या आयांना सुरक्षित ठेवणे आमचे पहिले कर्तव्य होते. आम्ही मुलांना जखमी होण्यापासून बचाव करण्यासाठी भिंतीच्या जवळ सर्व पाळणे ठेवले. दवाखान्यातील अधीक्षक अमिता जोशी यांनी सांगितले की आता दवाखान्यात सशस्त्र गार्ड आहे निगराणीसाठी 67 सीसीटीवी लावण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लातुरातील राज्य सभा उमेदवार आम्हीच ठरवू - रावसाहेब दानवे