Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

35 तास उलटले तरी कमांडोंचे ऑपरेशन सुरूच

हल्यात 137 जणांचा बळी, 350 जखमी

35 तास उलटले तरी कमांडोंचे ऑपरेशन सुरूच
मुंबईतील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याला 35 तास उलटले तरी कमांडोंचे ऑपरेशन सुरूच आहे. ताज, ओबरॉय येथे परिस्थिती काहीशी निवळली असली तरी कुलाब्याच्या नरिमन हाऊसमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार आणि ग्रेनेड स्फोट सुरूच ठेवले आहे. सकाळी नरीमन हाऊसच्या छतावर हॉलिकॉप्टने कमांडो उतरले असून ऑपरेशन सुरू झाले आहे.

दरम्यान, ताज व ओबरॉयमधील कारवाई पुर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी काही जखमी अतिरेकी अजूनही हॉटेलमध्ये लपले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नरिमन हाऊसमध्ये अडकून पडलेल्या इस्त्रायली नागरिकांना सोडवण्यात कमांडोंना यश आले आहे मात्र, तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी कमांडो या इमारतीमध्ये घुसले आहेत.


बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान सुरू झालेला हा दहशतवादी हल्ला आता सुमारे 32 तास उलटूनही क्षमलेला नाही. पोलिस आणि कमांडोंनी संयुक्तरित्या मोहीम राबवूनही दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी तब्बल दोन दिवस मुकाबला करावा लागला आहे. दहशतवाद्यांकडे एवढी स्फोटके आली कोठून आणि ती मुंबईत दाखल झालीच कशी? या प्रश्नामुळे सुरक्षायंत्रणाही चक्रावल्या आहेत. या हल्यामध्ये 137 हून अधिक लोकांचे जीव घेतले. त्यामध्ये 14 पोलिस अधिका-यांचा आणि 11 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. ताज हॉटेलमध्ये कमांडोच्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान, गुरुवारी रात्री कुलाब्याच्या नरिमन हाऊस बिल्डिंगमध्ये अडकलेल्या नागरिकांची कमांडोंनी मुक्तता केली. दहशतवाद्यांकढून हल्ला होण्याची शक्यता असल्याने परीसरातील इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या. अपेक्षेनुसार दहशतयाद्यांनी कमांडोंवर ग्रेनेड फेकण्यास सुरूवात केली. मध्यरात्री दोनवेळा त्यांनी रस्त्यावर ग्रेनेड फेकले. आज शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान नरीमन हाऊसच्या छतावर हॉलिकॉप्टने कमांडो उतरले असून ऑपरेशन सुरू झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi