Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

4-locals-held-for-doctor-deepak-amrapurkars-death-in-open-manhole
, सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (10:07 IST)

बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मुंबईतील 29 ऑगस्टच्या तुफानी पावसात मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाड्याजवळ सापडला होता.

याप्रकरणी  सिद्धेश भेलसेकर (25), राकेश कदम (38) त्याचा भाऊ निलेश आमि दिनार पवार (36) यांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या चौघांनी मॅनहोलचं झाकण उघडलं होतं. पावसामुळे त्यांच्या घरात पाणी येत होतं, ते घालवण्यासाठी त्यांनी मॅनहोलचं झाकण हटवल्याचं सांगण्यात येत आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे बंधूची भेट निव्वळ योगायोग