Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी
, शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (18:29 IST)
एटामधील अलीगंज शहरात माकडांची दहशत आहे. शुक्रवारी जुन्या तालुक्यात  विक्रीचे व्यवहार करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्की मधून माकडांनी एक लाख रुपये काढून ते उडवून दिले. नोटांचा पाऊस सुरू होताच तेथे उपस्थित वकील आणि त्यांच्या कारकुनांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्याला एक नोट वगळता संपूर्ण रक्कम परत मिळाली.
 
सदर प्रकरण नगला केसरी गावात राहणारे सर्वेश शुक्रवारी दुपारी अलिगंज तहसीलमध्ये जमिनीचे करारनामा करण्यासाठी आले असता.आपल्या वकिलाशी बोलत होते. दुचाकीच्या डिक्की मध्ये 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल ठेवले होते. मग अचानक माकडाने डिक्की उघडून पैशाचे बंडल  बाहेर काढले. हातात नोटांचा बंडल धरून माकड वकिलांच्या चेंबरच्या इमारतीच्या वर जाऊन बसले. सुमारे अर्धा तास लोक त्यांच्याकडून पैसे परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहिले. सर्वेशने माकडाला केळी दिल्यावर माकडाने नोटांची एक गड्डी  फेकून दिली, तर माकडाने दुसरी  गड्डी  हवेत फेकली .
 
सर्वत्र तालुक्याच्या आवारात नोटांचा पाऊस पडला. नोटा जमिनीवर पडल्या आणि विखुरल्या. वकिलांनी आणि त्यांच्या सहाय्यकांनी एक एक करून नोटा जमा करून त्या शेतकऱ्याला परत केल्या. सर्वेशने सांगितले की, एक लाख रुपयांपैकी 500 रुपयांची एक नोट सापडली  नाही.
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले