मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आणलेलं 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जप्त केलं आहे.
हे कोकेन सुमारे 52 किलो इतकं असून त्याची किंमत जवळपास 500 कोटी इतकी आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मालवाहू जहाजावरून कोकेन जप्त करण्यात आले त्यात 25 मेट्रिक टनाच्या 1 हजार मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, DRIने 24 ते 26 मे या कालावधीत केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात 52 किलो कोकेन सापडलं.
दरम्यान, 2021-22 या वर्षात DRI ने देशभरात कारवाई करत सुमारे 321 किलो कोकेन जप्त केले होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3 हजार 200 कोटी रुपये होती.