गुजरातमध्ये एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. बुडालेल्यांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील काही लोक नर्मदा जिल्ह्यातील पोईचा येथे मंदीरात पूजा केल्यावर नदीत अंघोळीसाठी आले असता 17 जणांपैकी 7 जण नदीपात्रात बुडून बेपत्ता झाली.
सदर घटना 14 मे रोजी दुपारी 12 वाजेची आहे. अंघोळीला काही जण आले असता नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने अल्पवयीन मुलांसह एकाच कुटुंबातील 7 जण नर्मदा नदीच्या पात्रात बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफ दलाचे जवान शोध घेत आहे. त्यांचा अद्याप शोध लागू शकला नाही.
पोलिसांनी सांगितले की, सर्व बळी सूरतमधील एका गटाचे होते जे पोइचा येथे आले होते. मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पोइचा हे नर्मदा नदीत पोहण्यासाठी प्रसिद्ध उन्हाळी पिकनिक स्पॉट आहे. अलीकडेच नर्मदा जिल्हा प्रशासनाने स्थानिक बोट चालकांना परवान्याशिवाय बोटी चालवू नयेत, असे निर्देश दिले होते.आज सकाळी 8 वाजता एक मृतदेह सापडला. दोन बोटींचा वापर करून बचावकार्य सुरू आहे. उर्वरित सहा मृतदेहांचा शोध सुरू आहे."