Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सात दिवस लिव्ह इन मध्ये राहून वृद्ध जोडप्याचा विवाह

सात दिवस लिव्ह इन मध्ये राहून वृद्ध जोडप्याचा विवाह
रायपूर- हल्ली मुंबईसारख्या बड्या शहरांमध्ये उच्चभ्रू समाजातील अनेक जोडपी आधी एकत्र राहून मगच लग्नाचा विचार करतात. छत्तीसगढमध्ये 75 वर्षांचे रतिया राम आणि 70 वर्षांच्या जिमनीबरी यांनी सात दिवस एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून नंतर धूमधडाक्यात लग्न केले. त्यांच्या विवाहाला स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांपासून अनेक लोक उपस्थित होते. 
 
रतियाराम यांच्या पहिल्या पत्नीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना दोन मुली असून दोघीही आपल्या सासरी राहतात. पत्नीच्या मृत्यूनंतर आणि मुलींचे लग्न झाल्यावर रतियाराम एकटे पडले होते. एक महिन्यापूर्वी आपल्या एका मुलीच्या गावी त्यांची भेट जिमनीबरी बाईशी झाली. त्यांच्या पतीचेही निधन झाले असून त्यांना दुसरे जवळचे नातेवाईक कुणी नाहीत. दोघांनी एकमेकांबरोबर बोलून लग्न करण्याचे ठरवले. दोघे बगडोल झगरपूरमध्ये एकत्र राहू लागले आणि सात दिवसांनी त्यांनी लग्न केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विघ्न टाळावे वीज अपघाताचे...