चेन्नई मधील अवाडी मधील एका अपार्टमेंट मध्ये धक्कादायक प्रसंग घडला आहे. अवाडी मधील अपार्टमेंट मध्ये एक 8 महिन्याची मुलगी चौथ्या मजल्यावरून पडून दुसऱ्या मजल्यावर लटकली. तसेच परिसरातील लोकांच्या तत्परतेने या बाळाला वाचवले.
या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीचे नाव हरिन मैगी होते. ही 8 महिन्याची मुलगी चौथ्या मजल्यावरून पडून दुसऱ्या मजल्यावर लटकली. परिसरातील लोक मुलीला वाचवण्यासाठी मोठ्याने आरडाओरडा करीत होते. तसेच लोकांनी त्या खिडच्या खाली चादर पसरून उभे राहिले जर मुलगी पडली तर चादरीमध्ये पडेल.
तसेच या मुलीला वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून एका व्यक्तीने तिला पकडण्यासाठी हात पुढे केला व दोन व्यक्तींना त्याला धरून ठेवले. व अश्याप्रकारे या लहान बाळाला वाचवण्यात यश आले. या लहान बाळाची आई बालकनीमध्ये बसून तिला दूध पाजत होती त्या दरम्यान ही मुलगी बालकनीतून दुसऱ्या मजल्यावर येऊन पडली.
Edited By- Dhanashri Naik