Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

8 नोव्हें : काँग्रेसचा काळा दिवस, भाजपचा ‘काळेधन विरोधी दिन’

8 नोव्हें : काँग्रेसचा काळा दिवस,  भाजपचा ‘काळेधन विरोधी दिन’
, सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (17:00 IST)

येत्या 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस महासचिव आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस मुख्यालयात बैठक झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांची या बैठकीला हजेरी होती. 8 नोव्हेंबरला देशात कशा पद्धतीने आंदोलन करायचं, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

दुसरीकडे हा दिवस भाजपच्या वतीने देशभरात ‘काळेधन विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. काळा पैसा बाहेर काढण्याचं लक्ष्य ठेवून केंद्र सरकारने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर केली होती. एकाचवेळी अर्थव्यवस्थेतील 84 टक्के चलन रद्द करण्यात आलं होतं. या नोटाबंदीनंतर देशभरात अभूतपूर्व चलनतुटवडा निर्माण झाला. आर्थिक व्यवहारांसाठी लोकांना पैसा मिळत नव्हता.

त्यामुळे विरोधकांनी हा काळा दिवस साजरा करण्याचं घोषित केलं होतं. त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर देताना ‘काळेधन विरोधी दिन’ हा दिवस साजरा करणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रीज, एसी, वॉशिंग मशिन महागणार