Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वायनाड भूस्खलनात आतापर्यंत 84 ठार, 116 जखमी, लष्कर-एनडीआरएफ बचावकार्यात गुंतले; राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

वायनाड भूस्खलनात आतापर्यंत 84 ठार, 116 जखमी, लष्कर-एनडीआरएफ बचावकार्यात गुंतले; राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर
, मंगळवार, 30 जुलै 2024 (17:33 IST)
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात नैर्सगिक आपत्ती झाली असून या भागात भुस्खनल होऊन आता पर्यंत 84 लोक मृत्युमुखी झाले आहे. तर 116 जण जखमी झाले आहे. अजून शेकडो लोक तिथे अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफचे जवान मदत आणि बचाव कार्य करण्यात गुंतले आहे. मात्र या ठिकाणी पावसामुळे बचावकार्यात कठीण आव्हानांना समोरी जावे लागत आहे. 
 
केरळच्या वायनाड मधील चुरमला भागात भारतीय लष्कर आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहे. या भुस्खनलात 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

राज्य सरकारने मृतांच्या प्रति शोक व्यक्त केला असून दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव शेखर कुरियाकोसे म्हणाले की, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून आमच्याकडे पुरेसे सैन्य आहे. NDRF आधीच तैनात करण्यात आले आहे...

10 अग्निशमन आणि बचाव पथके, 200 नागरी संरक्षण स्वयंसेवक, 3 NDRF टीम कार्यरत असल्याचे ते म्हणाले, आम्ही एनडीआरएफची चौथी टीम, संरक्षण सुरक्षा पोलिसांची दोन टीम आणि नौदलाची नदी क्रॉसिंग टीम येथे पाठवण्याची विनंती केली आहे. आम्ही लष्कराला इंजिनीअरिंग टास्क फोर्सचीही विनंती केली आहे. या सैनिकांना नेण्यासाठी आमच्याकडे विमाने तयार आहेत.

या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 70 हुन अधिक मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अजूनही बरेच लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.  
Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाइन गेममधल्या 'टास्क'साठी 15 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनी काय काळजी घेतली पाहिजे?